मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं; जरांगेच्या डोळ्यात अश्रू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत मराठा समाजाचे लाखो लोक असणार आहेत. तत्पूर्वीच जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. मराठ्यांनो आता ही शेवटची लढाई आहे. आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे. आता मी शहीद झालो तरी माघार नाही. मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं असं म्हणताना मनोज जरांगे पाटलांचे डोळे पाणावले.

जरांगे पाटील म्हणाले, आमचे पोरं जर मोठे करायचे असतील तर आज मुंबईला जाण्यापासून पर्याय नाही. आता मी शहीद झालो तरी माघार नाही. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. सरकारच्या दारात मरण आले तरी आता माघार नाही. माझ शरीर मला साथ देत नाही. मी असेन किंवा नसेन पण मला माहित नाही पण समाजाची एकजूट फुटू देऊ नका असं म्हणताना मनोज जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.

सरकारला ७ महिने वेळ दिला, आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही. सरकार मराठ्यांना वेठीस धरत असलेत तर आम्ही सुद्धा आता आता मागे हटणार आहे. आता प्राण गेले तरी माघार नाही. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी सरकार आरक्षण देत नसेल तर लढावं लागेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल. मुंबईत तीन कोटी मराठा दिसणार आहे, असे आमचे नियोजन झाले आहे. सर्वानी व्यवस्थित आणि शिस्तीत या, अंथरुण, पांघरुन, जेवणाचे साहित्य सोबत घ्या असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं केलं. आम्ही अनेक गोष्टी उघड केल्या नाहीत. सरकार ज्या पद्धतीने वागणार तशी आमची रणनीती तयार आहे असेही ते म्हणाले.