हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. परंतु अशा परिस्थितीत जरांगे पाटलांचे नाव एका दुसऱ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या तुळशीराम गुजर (Tulashiram Gujar) यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये (VBA ) प्रवेश केला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत तुळशीराम गुजर यांनी हा पक्षप्रवेश केला आहे. मात्र गुजर हे जरांगे पाटलांसारखे दिसत असल्यामुळे मनोज जरांगे यांनीच वंचितमध्ये प्रवेश केल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर रंगल्या आहेत.
मुख्य म्हणजे, अकोल्यामध्ये राहणारे तुळशीराम गुजर हे हुबेहूब म्हणून जरांगे पाटील यांच्यासारखे दिसतात. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुजर हे आंतरवाली सराटीकडे निघाले होते. यापूर्वी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. तेव्हाच त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेश कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुजर हे हुबेहूब जरांगे पाटील यांच्यासारखेच दिसतात, ही चर्चा सुरू झाली. मात्र जरांगेंऐवजी गुजर यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, वंचितमध्ये प्रवेश केलेले तुळशीराम गुजर हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत. ते अकोला शहरातील जुने शहर वस्तीमध्ये राहतात. फक्त योगायोग यामुळे त्यांचा चेहरा जरांगे पाटील यांच्यासारखा दिसतो. त्यामुळे गुजर हे जरांगे पाटील यांचे भाऊ आहेत का? असा गैरसमज देखील लोकांना होत आहे. मात्र यावर बोलताना गुजर म्हणतात की, मला फार अभिमान वाटतो की मी मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा दिसतो. दररोज अनेक लोक मला येऊन भटतात, माझे कौतुक करतात, माझ्यासोबत सेल्फीही घेतात. मला देखील त्यातून आनंद मिळतो.