Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या लाखो बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा अशी याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. यावर आज न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने मोठा निर्णय घेत जरांगे पाटील याना नोटीस जारी केली आहे. तसेच मुंबई हायकोर्टाने गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.
कोर्टात नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या या पदयात्रेमुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई तसेच मनोज जरांगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. एवढच नव्हे तर मनोज जरांगे यांना परवानगी दिली तर आपण कोर्टात त्या परवानगीला चॅलेंज देऊ, असंही सदावर्ते आपल्या याचिकेत म्हणाले आहेत.सदावर्ते यांच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी राज्य सरकारकडून महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ उपस्थित होते. आमच्याकडे अद्याप मनोज जरांगे किंवा त्यांच्याकुणाकडूनही आंदोलनाची परवानगी मागणारं पत्र आलं नसल्याचे महाधिवक्ता यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच या आंदोलनामुळे इथलं जनजीवन विस्कळीत होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे असेही त्यांनी म्हंटल.
न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले?? Manoj Jarange Patil
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तीनी काही महत्त्वाचे निर्देश दिले. जरांगे यांच्या आंदोलनांदरम्यान, रस्ता ब्लॉक होणार नाही आणि वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असं कोर्टाने म्हंटल. तसेच मनोज जरांगे पाटलांना हायकोर्टात हजर होण्याबाबत नोटीस बजावा (Mumbai HC Notice To Manoj Jarange Patil) . ही नोटीस आझाद मैदान पोलिसांद्वारे बजावावी. एवढच नव्हे तर आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त मराठा बांधव येवू शकत नाही हे देखाल त्यांना कळवण्यात यावे”, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.