मराठमोळे मनोज नरवणे होणार नवे लष्करप्रमुख; जनरल बिपीन रावत ३१ डिसेंबरला निवृत्त होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे भारतीय सैन्याचे नवे लष्करप्रमुख होणार आहेत. नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

देशाचे नवीन लष्करप्रमुख निवडताना सेवाज्येष्ठतेचाच विचार करण्याचा निर्णय केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने केला आहे. त्यामुळे मराठी मुलुखातील मूळ पुण्याचे असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हेच आता देशाचे पुढील लष्करप्रमुख असतील. आर्मीचे सध्याचे प्रमुख जनरल बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबरला निवृत्त होत असताना सध्या उपप्रमुख असलेल्या लेफ्टनंट जनरल नरवणे यांनाच यापदी बढती दिली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यापदावरील ते दुसरे मराठी अधिकारी असतील.

सध्या लष्करात बिपीन रावत यांच्यानंतर मनोज नरवणे हे सर्वाधिक ज्येष्ठ अधिकारी आहेत. तर सर्जिकल स्ट्राईकचे हिरो व सध्या उत्तर कमांडचे प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग हे दुसऱ्या स्थानी आहेत. परंतु सिंग हे सर्जिकल स्ट्राइकच्यावेळी लष्करी मोहिमांचे महासंचालक होते

Leave a Comment