नवी दिल्ली । देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेने सर्वत्र अराजक पसरले आहे. सर्व राज्य सरकारांनी स्वतःहून निर्बंध लादले आहेत. याशिवाय लॉकडाउनमुळे कामगारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आर्थिक कामे पूर्णपणे बंद आहेत. अशा परिस्थितीत कामगारांसाठी मनरेगा हा एकमेव आधार उरला आहे. मनी कंट्रोल न्यूजनुसार मनरेगा (manrega) मधील कामगारांना 2 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.
पश्चिम सिंगभूम, रांचीमध्ये अनेक महिन्यांपासून कामगारांना मानधन दिले जात नाहीये. जिल्ह्यातील प्रत्येक गटात मजुरांना 60-70 रुपये पेमेंट दिले जाते. खासदार गीता कोडा यांनी मजुरांना वेतन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांना पत्र लिहिले असून, कामगारांना थकबाकी लवकरच देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
9 कोटी रुपयांचे पेमेंट बाकी आहे
गीता कोडा यांच्या म्हणण्यानुसार 50 लाखाहून अधिक रक्कम वेतनाच्या स्वरूपात अडकली आहे. एकूणच सुमारे 9 कोटी रुपये वेतन म्हणून बाकी आहे. हे 2 महिन्यांपासून दिले गेले नाही. असे म्हटले जात आहे की, राज्यात मनरेगा मजुरांना मार्च 2021 मध्ये वेतन दिले गेले नाही.
लवकरच पेमेंट दिले जातील
माध्यमांच्या वृत्तानुसार, आयुक्त हे पद सुमारे एक महिन्यापासून रिकामे होते, त्यामुळे पेमेंट दिले गेले नाहीत. त्याचबरोबर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच कामगारांना मोबदलाही देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. वेतन न दिल्याने कामगारही कामात रस घेत नाहीत.
कोणत्या राज्यात दररोज किती वेतन मिळते?
>> झारखंड – 194 (आता 225 रुपये करण्याचा निर्णय)
>> आंध्र प्रदेश- 237
>> अरुणाचल प्रदेश-205
>> असम-213
>> बिहार-194
>> छत्तीसगढ़-190
>> गोवा- 280
>> गुजरात-224
>> हरियाणा-309
>> हिमाचल प्रदेश – अनुसूचित क्षेत्र 198 आणि अनुसूचित जमाती क्षेत्र 248
>> जम्मू आणि कश्मीर-204
>> लद्दाख-204
>> कर्नाटक-275
>> केरल-291
>> मध्य प्रदेश-190
>> महाराष्ट्र-238
>> मणिपुर-238
>> मेघालय-203
>> मिजोरम-225
>> नागालँड-205
>> उड़ीसा-207
>> पंजाब-263
>> राजस्थान-220
>> सिक्किम-205
>> तमिलनाडु-259
>> तेलंगाना-237
>> त्रिपुरा-205
>> उत्तर प्रदेश-201
>> उत्तराखंड-201
>> पश्चिम बंगाल-204
>> अंडमान आणि निकोबार-267
>> दादरा आणि नगर हवेली-258
>> दमन आणि दीव- 227
>> लक्ष्यदीप-266
>> पांडुचेरी-256