मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून ला पोषक वातावरण तयार झाले असून यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. केरळ येथे मान्सून दाखल झाला असून येत्या २ ते ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येत्या २ – ३ दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून यामुळे बळीराजा सुखावला आहे. सध्या शेतकऱ्यांची पेरणी सुरु असून मान्सून वेळेआधी दाखल होणार असल्याने यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. १० जून पर्यंत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, गोवा आणि दक्षिण कोकणाकडे मान्सूनची वाटचाल सुरु असून लवकरच तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मान्सून वेळे आधीच दाखल होणार आहे. तसेच पुढील ४८ तासात तेलंगणा, ओडिसा, महाराष्ट्र, गुजरात या चार राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.