PM Kisan : मोदी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्ह्णून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाखो शेतकरी लाभ घेत आहेत. जर तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
सध्या मोदी सरकार या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये देते. ही रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. आणि आता 16व्या हप्त्याची नोंदणीही सुरू झाली आहे.
अशा प्रकारे जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला (pmkisan.gov.in) भेट देऊन नोंदणी करू शकता. सरकारने 15 व्या हप्त्यात सुमारे 8 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते.
दरम्यान असे सांगितले जात आहे की पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याच्या म्हणजेच 16व्या हप्त्याच्या लाभार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या का कमी झाली आहे याचे कारण तुम्ही जाणून घ्या.
लवकर ई-केवायसी करा
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने जमीन पडताळणी आणि ई-केवायसी अनिवार्य केले आहे. जर कोणत्याही शेतकऱ्याने ई-केवायसी आणि जमीन पडताळणी केली नसेल तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे देशातील अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या 15 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे तुम्हाला यापुढेही असाच लाभ घ्यायचा असेल तर पीएम किसान पोर्टल किंवा सीएससी केंद्राला भेट देऊन केवायसी करू शकता.
नोंदणीमध्ये चूक
पीएम किसान नोंदणी करताना काही चूक झाली तरी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. याशिवाय तो लाभार्थी यादीतून बाहेर असू शकतो. यासाठी शेतकऱ्याने अर्ज करताना कोणतीही चूक करू नये. जेणेकरून तुम्हाला पुढे अडचणी निर्माण होणार नाही.
पीएम किसान हेल्पलाइन नंबर
पीएम किसान योजनेतील नोंदणीबाबत तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. शेतकरी १५५२६१ किंवा १८००११५५२६ (टोल फ्री) किंवा ०११-२३३८१०९२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. याशिवाय शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करू शकतात.