हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठकीत पार पडली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. त्यामुळे आजच्या या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामध्ये, अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय उभारण्याचा तसेच, कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरीने इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
आजच्या बैठकीतील निर्णय
1) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
2) त्याचबरोबर, ‘महाप्रित’ मार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार आणि परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार हा देखील निर्णय घेतला गेला आहे.
3) तसेच, राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार आणि पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार हा निर्णय घेण्यात आला आहे.
4) आजच्या बैठकीत कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता मिळाली आहे.
5) इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने देण्याचा आणि कामगार नियमांत सुधारणा करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे.
6) बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण राज्य सरकार राबविणार आहे.
8) राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
9) त्याचबरोबर, अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय उभारण्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉 संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे –
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 19, 2023