हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली 16 जूनपासून आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पण काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मते मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय निष्पन्न होणार, त्यापेक्षा ज्या ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत, तिथे त्यांनी आवाज उठवला तर फायदा होईल, असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षण व्हावे अशी सरकारचीही इच्छा आहे. त्यामुळे मोर्चा नेमका कोणाच्या विरोधात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता सर्व अधिकार केंद्राचे आहेत. आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनी भूमिका घेतली तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो असे चव्हाण म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.