आताची शिवसेना सोनियांची सेना आणि खिल्जीसेना : अक्षता तेंडूलकर

मुंबई | राम मंदिराच्या भूसंपादनात घोटाळ झाल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या जमिनीबाबत घोटाळा झाल्यांचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला होता. मात्र त्यांची माहीती लागल्याने शिवसैनिकांनीही गर्दी केली होती. यानंतर तेथे मोठा राडा झाला, यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

शिवसेना भवनासमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणी भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह 7 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी अक्षता तेंडुलकर यांनी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही तर सोनियांची सेना झाली आहे. तसेच ही शिवसेना नव्हे, ही तर खिल्जीसेना आहे असा हल्लाबोल अक्षता तेंडुलकर यांनी केला आहे.

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like