हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापूर येथे मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा काढणारच, असा इशारा त्यानी दिला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं पाटील यांनी सांगितलं.केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार असून या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांना भेटून पत्रं देण्यात येणार असल्याचंही नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.
आम्ही आक्रमक झालो तरच राज्यातील महाविकास आघाडी सरकार दखल घेईल. अन्यथा आपली दाखल घेतली जाणार नाही. मराठा समाज लढवय्या समाज आहे त्यामुळे आता आक्रमक होण्याशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांनी सांगितलं.