Maratha Reservation : हा विजय माझा नव्हे तर मराठा समाजाचा, आंदोलन स्थगित करणार- जरांगेंची घोषणा

Maratha Reservation Jarange patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maratha Reservation : मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे तब्बल ५ महिन्यापासून सुरु असलेल्यामजुन जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. मात्र हा विजय माझा विजय नसून संपूर्ण मराठा समाजाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. तसेच आता आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार आहे अशी मोठी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आम्ही आरक्षणासाठी (Maratha Reservation) खूप संघर्ष केला, पण आम्ही मुंबईत आल्यानंतरच सरकारने अध्यादेश काढला. कारण हे काढतच नव्हते मात्र जेव्हा मराठा चारही बाजूनी मुंबईत येऊ लागला तेव्हा सरकारला धसका बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज आम्ही अध्यादेश घेणार आहोत. अध्यादेश म्हणजे एकप्रकारचा जमिनीचा सातबारा असल्यासारखाच आहे. सरकारने गुन्हे मागे घेण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. तसेच सगेसोयरे यांच्याबाबातही अध्यादेश काढण्यात आला आहे त्यामुळे आता आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल.

इथून पुढेही लढत राहणार- Maratha Reservation

मराठा समाजाने दिवाळी साजरी करावी, खूप वर्षांनी हे आरक्षण (Maratha Reservation) आपल्याला मिळालं आहे त्यामुळे मराठा समाजाचा हा मोठा विजय आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल. इथून पुढेही मी मराठा समाजासाठी लढतच राहणार आहे, जरी जीआर मध्ये काही अडचणी आल्या, किंवा नोंदी मध्ये अथवा नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात काही अडचणी आल्या तरी मी लढतच राहणार आहे. आम्हाला आता विजयी सभा घ्यायची आहे, मात्र ती कुठे घ्यायची हे अजून नक्की नाही त्यामुळे आंतरवाली मध्ये गेल्यानंतरच सर्वांशी चर्चा करून याबाबत सांगेन असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. आम्ही जातीवाद कधीही केला नाही आणि करणार नाही असेही त्यांनी ठासून सांगितलं.