Wednesday, February 1, 2023

फक्त नाव अमेय सांग, वाघ सांगितलंस तर..; अमेयच्या फोटोवर मजेशीर कमेंट्सचा पाऊस

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अमेय वाघ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह आहे. तो नेहमीच त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसह शेअर करीत असतो. नुकताच त्याने कोरोना वॅक्सीन घेतानाच फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्याने एक भन्नाट कॅप्शनसुद्धा लिहिल आहे. या कॅप्शनची सगळीकडे चर्चा रंगली आहे. मात्र त्याहीपेक्षा विशेष असं कि त्याच्या या फोटोवरील कॅप्शन इतक्याच भन्नाट आणि एकापेक्षा एक जबरदस्त कमेंट्स नेटकरी करत आहेत.

- Advertisement -

अमेयने अलीकडेच कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. याचा फोटो अमेयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या हटके स्टाईलमध्ये फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले कि, व्हॅक्सिन घेतलं आणि फोटो टाकला नाही की अँटीबॉडीज रूसतात म्हणे ! थँक यु पीएमसी पुणे चांगल्या सर्व्हिससाठी. अमेयने या कॅप्शनच्या पुणे महानगर पालिकेचे देखील आभार मानले आहेत. या फोटोवर अमेयच्या चाहत्यांनी कमेंट्स चा नुसता पाऊस पाडला आहे.

एका युजरने फक्त नाव अमेय सांग, वाघ म्हटलंस तर ट्रान्स्क्यूलीझर देतील अशी मजेशीर भन्नाट कमेंट केली आहे. तर एका युजरने म्हटले वाघाला सुई टोचली, बाई फारच शूर वीर आहेत. तर अन्य एका युजरने म्हटले कि, तुमच्या बरोबर लस घेण्याचा योग आल्याने अँटी बॉडीज डबल खुश झाल्या. अश्या भन्नाट कमेंट्स चाहते अमेयच्या फोटोवर करत आहेत.

 

फोटो शेअर करण्याआधी अमेयसह पुण्यातील काही कलाकार मंडळीने पुढाकार घेत पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुल येथे पोलिसांचे गुलाबपुष्प आणि सुरक्षा कीट प्रदान करत कौतुक केले होते. यावेळी अमेय म्हणाला होता की, आमच्या आधीच्या पिढीतील माणसांनी वेगवेगळ्या प्रकारची संकटे पाहिली होती. मात्र, कोरोना हे आमच्या पिढीने आत्तापर्यंत पाहिलेलं सर्वात मोठं संकट आहे. पण या संकटात देखील राज्याचं संपूर्ण पोलीस दल ज्या हिरीरीने सर्वच पातळ्यांवर अहोरात्र लढा देत आहे ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. आज आम्ही फक्त कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने पोलिसांविषयी आदर व्यक्त करण्याकरिता एकत्र जमलो आहोत.