हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचं संकट पाहता पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला आहे. सद्यस्थितीत अशा सभांमुळे जनता आणि देशाला किती धोका आहे याचा विचार राजकीय पक्षांनी करायला हवा, असं राहुल गांधींनी ट्विट करत सांगितलं. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतूक होत आहे. यावर प्रसिद्ध मराठी अभिनेता हेमंत ढोमेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आत्ताच्या काळात निवडणूका येतील जातील… यश मिळेल नाहीतर अपयश मिळेल…पण लोकांचा जीव महत्त्वाचा आहे… देशाला आत्ता निवडणूका नकोत तर बेड्स हवेत, औषधं हवीत, ॲाक्सीजन हवाय! जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणूस बोलतोय! पण आपण या माणसावर हसुया, मस्करी करूया… मजेत राहुया! असं हेमंतनं रिट्विट करताना लिहिलं आहे.
आत्ताच्या काळात निवडणूका येतील जातील… यश मिळेल नाहीतर अपयश मिळेल…
पण लोकांचा जिव महत्त्वाचा आहे… देशाला आत्ता निवडणूका नकोत तर बेड्स हवेत, औषधं हवीत, ॲाक्सीजन हवाय!जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणुस बोलतोय!
पण आपण या माणसावर हसुया, मस्करी करूया… मजेत राहुया! https://t.co/4PTRe2pHnZ
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) April 18, 2021
दरम्यान, सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. राज्यात एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. यापैकी पाच टप्प्यांमधलं मतदान पूर्ण झालं आहे. तर तीन टप्पे शिल्लक आहेत