मिस यू लक्ष्या..! अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी मित्राच्या आठवणीत शेअर केला जुना फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील सदाबहार नट. ज्याला विसरणे आणि ज्याचे पुन्हा होणे शक्य नाही म्हणजेच तुमचा आमचा आवडता लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डेकर. विनोदाचे परफेक्ट टायमिंग आणि अप्रतिम अभिनयाच्या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. एकापेक्षा एक सर्रास भूमिका बजावणारा हा अभिनेता लक्ष्मीकांत वरून लक्ष्या कधी झाला हे प्रेक्षकांनाही कळले नाही. त्याचे असणे निव्वळ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी होती. मात्र नियतीला हे काही मान्य नव्हते. तो आला.. त्याने पाहिलं.. जिंकून घेतलं सारं.. अन्.. अन अवघं जगं जिंकून त्याने याच जगाचा कायमचा निरोप घेतला. यानंतर जणू मराठी चित्रपटसृष्टी पुरती कोलमडली होती. यात लक्ष्यासोबत जिगरा असणारे त्याचे मित्र आजही त्याच्याशिवाय अपूर्ण आहेत. नुकताच सचिन पिळगांवकर यांनी लक्ष्याच्या आठवणीत एक जुना फोटो फेसबुकवर शेअर केला आहे आणि मिस यू लक्ष्या म्हणत आठवणींना उजाळा दिला आहे.

‘लक्ष्मीकांत – महेश कोठारे – अशोक सराफ’ हे विनोदी मराठी चित्रपटांचं त्रिकुट होतं. मात्र यात ‘लक्ष्या – सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ’ हे त्रिकूटही प्रचंड प्रसिद्ध होते. तसे पाहता लक्ष्या कुणाचा मित्र नव्हता.. तसाच या त्रिकुटाचाही तो भाग होता. ‘भूताचा भाऊ’, ‘आयत्या घरात घरोबा’ या आणि अशा अनेक चित्रपटात या तिघांनि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाने तर चित्रपटसृष्टी गाजवली. इतकेच नव्हे तर आजही प्रेक्षक त्याच आनंदाने हा चित्रपट पाहतात. महेश कोठारे म्हणा किंवा सचिन पिळगांवकर म्हणा या प्रत्येकाशी लक्ष्याचं गणित चांगलं जमायचं. पडद्यावरील अभिनेता दिग्दर्शक नात्यासोबतच प्रत्यक्ष जीवनातही त्यांची खरोखरीच घट्ट मैत्री होती.

https://www.instagram.com/p/CH19y_RJOzz/?utm_source=ig_web_copy_link

असा हा विनोदाचा बादशहा आणि प्रेक्षकांसहित संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचा लाडका असलेला कलाकार अखेर पर्यंत सगळ्यांना हसवत राहिला. किडणीच्या महाभयंकर आजाराची चाहूलही लागू न देता लक्ष्याने १६ डिसेंबर २००४ साली संपूर्ण जगाचा निरोप घेतला. मात्र त्याने साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहेत. आज भले लक्ष्या आपल्यात नसेल पण तरी त्याने गाजवलेल्या भूमिकांमधून आजही तो आपल्यातच सहवास करीत असल्याचे भासते. आज इतक्या वर्षांनंतरही लक्ष्याच्या अभिनयाची आणि व्यक्तिमत्वाची जादू कमी झालेली नाही, हे वेळोवेळी जाणवते. कारण हेच सत्य आहे कि, असा नट पुन्हा होणे शक्य नाही..

Leave a Comment