दिपवीर, विरुष्काच्या रोमँटिक सेल्फींना हेमांगी कवी देतेय टक्कर; पतीसोबतचा फोटो केला शेअर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील मजेशीर आणि दिलखुलास अभिनेत्री हेमांगी कवीने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विविध धाटणीच्या भूमिकांमधून हेमांगीने आपल्या अभिनयाचा वेगळा असा ठसा उमटविला आहे. हेमांगी सोशल मीडियावरही चांगलीच ऍक्टिव्ह असल्याचे दिसते. ती बहुतेकदा सोशल मीडियावरही आपले फोटो आणि विचार आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. लॉकडाऊनच्या काळातही हेमांगी चाहत्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना पण मनोरंजन करत असते. आजकाल अनेक सेलेब्रिटी आपल्या पार्टनरसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. अश्या या कपल्सला आता हेमांगी टक्कर देतेय. तिनेही आपल्या पतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. पण मजेशीर कॅप्शनसोबत. त्यामुळे हा फोटो आणि तिचे कॅप्शन दोन्हीही भन्नाट वायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B-J40wQhNlm/?utm_source=ig_web_copy_link

लॉकडाऊनमध्ये सगळंच कास थांबून गेलय. सारेच घरात बंदिस्त झाले आहेत. पण लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त असणारे सेलिब्रेटी वेगवेगळ्या गोष्टी करत स्वतःला बिझी ठेवताना दिसत आहेत. बॉलिवूडचे ट्रेडिंग कपल म्हणजे दीपवीर आणि विरुष्का या कपल्सला लॉकडाऊनमुळे एकमेकांना वेळ देता येणं शक्य झाले आहे. एरव्ही शूटिंगमूळे किंवा अन्य वैयक्तिक कामांमुळे व्यग्र असलेल्या कलाकारांना असेही वेळ देणे जमत नाही.

https://www.instagram.com/p/CM1-XLhhyQb/?utm_source=ig_web_copy_link

त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान हे कपल रोमँटीक टाइम एन्जॉय करत आहेत. दरम्यान ते अनेक अनेक रोमँटिक सेल्फी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

https://www.instagram.com/p/CN4UxIyllPS/?utm_source=ig_web_copy_link

ते पाहून या दोन्ही बॉलिवूड कपलला टक्कर देईल असा पतीसोबतचा निवांत वेळ हेमांगीदेखील एन्जॉय करताना दिसतेय. पतीची सेवा करतानाचा एक फोटो तिने चाहत्यांसह अगदी मजेशीर अंदाजात शेअर केला आहे. हेमांगीने या फोटोला एक भारी कॅप्शनही दिले आहे. हे कॅप्शन सोशल मीडियावर अत्यंत लक्षवेधी ठरत आहे.

https://www.instagram.com/p/CNSIqXihVq1/?utm_source=ig_web_copy_link

हा फोटो पोस्ट करत हेमांगीने लिहीले आहे की, तिथं दिपविर, विरुष्का क्वारंटाईन काळात लय रोमांचिक सेल्फ्या पोष्टीत हायेत, मंग म्हणलं इथं आमी पन काय कमी नाय ! इस बंद कमरे में पतीदेव का कॅमेरा….हे ते कमरा… हे आपलं ते कमर दबा रहें हैं हम ! तो फिर क्या गम, तो फिर क्या गम ! हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी देखील अतिशय मेजशीर अंदाजात हटके कमेंट्स केल्या आहेत. हा फोटो शेअर केल्यानंतर अगदी काहीच वेळात इतका वायरल झाला आहे कि बस्स.. पण काही म्हणा, फोटो पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल कि खरोखरच हेमांगी किसीसेच कम नाही.

Leave a Comment