हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री शिवानी बावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. कोरोना काळात ती शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. नुकतीच ती ‘स्पायनल मस्क्यूलर ऍट्रोपी’ नावाच्या दुर्मिळ आजाराने पीडित मुलाला मदत करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आर्त साद घालताना दिसत आहे. या मुलाच्या उपचारासाठी सध्या १६ कोटी रुपयांची गरज आहे. शिवानीने काल एक व्हिडीओ पोस्ट करीत लोकांना या मुलाच्या उपचारात मदत करण्याचे आवाहन केले होते . तर नुकतेच सोशल मीडियावर तिने या मुलाच्या पालकांसमवेत प्रेक्षकांशी लाईव्ह सेशनच्या माध्यमातून संपर्क साधला आहे.
https://www.instagram.com/tv/CPIf-6Xn3ET/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री शिवानी बावकरने आज (२१ मी २०२१ रोजी) ४ वाजण्याच्या सुमारास लाईव्ह सेशन केले होते. या लाईव्ह सेशनमध्ये शिवानी आणि युआनसोबत त्याची आई सौ. रुपाली अमित रामटेककर देखील सामील होत्या. या सेशनमध्ये युआनच्या आईने सद्य परिस्थितीवर भाष्य केले आहे. आपल्या मुलाची अवस्था आणि लोक कोरोनाच्या काळातही मदतीस अग्रेसर आहेत याबाबत त्यांनी वक्तव्य करीत लोकांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले आहे.
https://www.instagram.com/p/COxLrlvA8st/?utm_source=ig_web_copy_link
या लाईव्ह सेशनच्या कॅप्शनमध्ये शिवानीने मदत करण्यासाठी युआनच्या बँक अकाउंटचे डिटेल दिलेले आहेत. यासोबत सेशनच्या समाप्तीस तिने लोकांना पुन्हा एकदा मदतीचे आवाहन केले आहे. आर्थिक जमत नसेल तर किमान शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि व्हिडीओ पोचून युआनला मदत मिळेल असेही तिने म्हटले आहे.
https://www.instagram.com/tv/CPGHjL5HuZS/?utm_source=ig_web_copy_link
या सेशनपूर्वी काल पोस्ट केलेल्या व्हिडीओ सोबत तिने कॅप्शनमध्ये म्हटले होते कि, युवान हा रुपाली आणि अमित रामटेककर यांचा मुलगा आहे. अवघ्या १५ महिन्यांचे हे बाळ आहे. त्याला ‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोपी’ हा दुर्मिळ आजार आहे.जगातील सर्वात महागड्या औषधाची त्याला आवश्यकता आहे. त्याच्या उपचारासाठी सुमारे १६ कोटी रुपयांची गरज आहे.
https://www.instagram.com/p/CMrKiRDBSWA/?utm_source=ig_web_copy_link
आपण देणगी त्यांना मदत करू शकता.या आजरावर केवळ हाच उपाय आहे. १६ कोटीचं इंजेक्शन ३० दिवसात देणं खुप गरजेचं आहे. मी सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना आवाहन करते कि, चला एकत्र येऊन बाळ युवानला जीवदान देऊयात. आपल्याकडून शक्य होईल तितकी आर्थिक मदत करूयात. यापुढे तिने आजच्या लाईव्ह सेशनबाबतची माहिती देखील दिली होती.