मनोरंजन |एखादा ध्येय वेडा तरून काय करु शकतो याचे उदाहरण पहायचे असेल तर आपल्या महाराष्ट्रातील अक्षय इंडिकर या तरुणाकडे आपण पाहू शकतो. FTII मधून शिक्षण घेतलेल्या अक्षयने सिनेमा क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू पाहतोय. डोह, उदाहरणार्थ नेमाडे अशा यशस्वी प्रयत्ना नंतर त्याने ‘त्रिज्याची’ मोठी झेप घेतली आहे.चीनमधील २२ व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचमध्ये त्रिज्याला स्थान मिळाले. ‘न्यू एशियन टॅलेंट’सह शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘त्रिज्या’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायांकन या स्पर्धात्मक विभागांत निवडण्यात आला होता.
चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षयने केले आहे तर छायांकन स्वप्नील शेटे याने केले आहे. चित्रकथी निर्मिती, बॉम्बे बर्लिन फिल्म, आणि फिरता सिनेमा यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे.त्रिज्याचे ट्रेलर कान चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आले आहे.
जगातील ११५ देशांच्या पाच हजार चित्रपटांमध्ये एखादा मराठी चित्रपट पहिल्या पाचामध्ये स्थान मिळतो हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. त्रिज्याच्या या यशाची दखल महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी पत्र लिहून घेतली. पत्रांमध्ये त्यांनी त्रिज्या आणि टीमचे कौतूक केले आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळून मराठी सिनेमाला वेगळ्या उंचीवर पोहचविण्याची जबाबदारी प्रेक्षकांची आहे.