मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता पुनर्विचार याचिका दाखल करणार : विजय वडेट्टीवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. अगोदर साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आमदार, खासदार का कमी पडले? असा प्रश्न विचारत त्यांच्याकडे जनतेने विचारणा करावी, अशी मागणी केली. त्यांच्यानंतर आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्य सरकार मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगितलं आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री वड्डेटीवार यांनी आज माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्य सरकार मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळवून देणार आहे. त्यांना त्यांचा आरक्षणाचा हक्क मिळावा म्हणून सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असून यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून अहवाल तयार केला जात आहे. तो अहवाल पंधरा दिवसांत येईल. अहवाल आल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून अगोदरच आघाडी सरकारला विरोधकांकडून धरेवर धरले जात आहे. अशा परिस्थितीत आता राज्य सरकारकडूनही मराठा समाजबांधवांच्या न्यायासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.

Leave a Comment