औरंगाबाद – घर बांधण्यासाठी माहेरावरुन दोन लाख रुपये घेवून येण्याची मागणी करून पती, सासरे, सासु व नणंद यांनी तेविस वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करून त्रास दिला व वेळोवेळी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने सासरकडील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याविषयी अधिक माहिती अशी की, जाकेराबी रफिक शेख वय २३ वर्षे रा म्हस्की ता. वैजापुर हिचे लग्न ३० एप्रिल २०१७ रोजी शेख रफीक शेख ईस्माईल रा. साजापुर यांचे सोबत झाले. त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. लग्नानंतर पती रफीक शेख, सासरे ईस्माईल शेख, सासु ताहेराबी, नणंद आयशा शेख यांनी सहा महिने चांगली वागणूक दिली. त्यानंतर घराचे बांधकाम चालू केल्याने जाकेराबी हीला माहेरावरुन दोन लाख रुपये घेवून ये असे सांगितले. परंतु वडीलांची व भावाची परिस्थीती हलाखीचे असल्याने तीने त्यांना पैसे मागितले नाही. त्यामुळे सासु-सासरे, व नणंद यांनी जाकेराबीला घरामध्ये किरकोळ घरगुती कारणावरून शिवीगाळ करुन व पती रफीकला एकाचे दोन वारंवार सांगीतल्याने रफीक मारहाण करुन त्रास देत असल्याने जाकेराबीने भाऊ शेख इम्रान व वडील शेख हुसेन यांना माहिती दिली. तेव्हा त्यांनी त्यांची शेती विक्री करून वडील, भाऊ व मामा शेख आय्युब जान मोहम्मद शेख, जाफर निझाम शेख व कडू रज्जाक शेख यांचे समक्ष घरबांधकामाकरीता दोन वर्षापूर्वी दोन लाख रुपये रोख दिले. त्यानंतर त्यांनी सात आठ महिने चांगली वागणूक दिली.
त्यानंतर परत घरातील किरकोळ कारणावरून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा घरबांधकामाकरीता माहेरावरून दोन लाख रुपये घेवुन येण्याचे सांगितले. या प्रकरणी जाकेराबीच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी रफीक शेख, ईस्माईल शेख, ताहेराबी शेख व नणंद आयशा शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.