शहरात आणखी ‘या’ दोन ठिकाणी होणार ऑक्सिजन प्लांट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महानगरपालिकेच्या मेल्ट्रोन येथील कोवीड रुग्णालय याबरोबरच आता पदमपुरा येथील कोवीड केअर सेंटर आणि गरवारे कंपनीतर्फे उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटरमध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित करण्याची शक्यता मनपाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर मनपाकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

याविषयी मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, मेल्ट्रॉनच्या कोवीड केअर सेंटर मध्ये 20 किलोलिटरचा ऑक्सीजन प्लांट उभारणीचे काम दीपक फर्टिलायझर्स कंपनीच्या माध्यमातून सीएसआर फंडातून सुरू आहे. असेच ॲरॉक्स या कंपनीचा ऑक्सीजन प्लांट देखील पूर्णत्वास आला आहे.

आता शहरातील पदमपुरा येथील अग्निशमन दलाच्या इमारतीत सुरू केलेल्या कोवीड केअर सेंटरसाठी 500 लिटर प्रति मिनिट उत्पादन क्षमतेच्या ऑक्सीजन प्लांट उभारला जाणार आहे. या प्लांट साठी देखील पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनपाला मदत केली असल्याचे आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांनी सांगितले.

Leave a Comment