सेन्सेक्सच्या टॉप 7 कंपन्यांची मार्केट कॅप वाढली, RIL ‘या’ लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सेन्सेक्सच्या पहिल्या 10 कंपन्यांपैकी 7 च्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात 1,31,173.41 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या आठवड्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), इन्फोसिस, HDFC, बजाज फायनान्स आणि विप्रो यांची मार्केट कॅप वाढली. त्याचबरोबर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट कॅप कमी झाली आहे.

या संपूर्ण आठवड्यात हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ची मार्केट कॅप 50,234.21 कोटी रुपयांनी वाढून 6,15,016.63 कोटी रुपये झाली. TCS ची मार्केट कॅप 35,344.44 कोटी रुपयांनी वाढून 13,15,919.03 कोटी रुपये झाली. बजाज फायनान्सची मार्केट कॅप 30,442.29 कोटी रुपयांनी वाढून 4,01,782.58 कोटी रुपये तर इन्फोसिसची 8,335.27 कोटी रुपयांनी वाढून 7,34,755.12 कोटी रुपयांवर पोहोचली.

HDFC ची मार्केट कॅप वाढली
या कालावधीत HDFC ची मार्केट कॅप 3,512.87 कोटी रुपयांनी वाढून 4,91,729.99 कोटी रुपये आणि विप्रोची मार्केट कॅप 2,385.11 कोटी रुपयांनी वाढून 3,39,632.11 कोटी रुपये झाली. आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने 919.22 कोटींची भर घातली आणि त्याची मार्केट कॅप 13,60,571.28 कोटींवर पोहोचली.

या कंपन्यांची मार्केट कॅप घसरली
या प्रवृत्तीच्या विपरीत SBI ची मार्केट कॅप 21,776.05 कोटी रुपयांनी घटून 3,63,187.07 कोटी रुपयांवर आली. आठवड्यादरम्यान, ICICI बँकेची मार्केट कॅप 16,854.73 कोटी रुपयांनी घटून 4,71,497.28 कोटी रुपये आणि HDFC बँकेची मार्केट कॅप 5,947.03 कोटींच्या तोट्याने 8,37,756.50 कोटी रुपये झाली.

रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर राहिली. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एसबीआय आणि विप्रो यांचा क्रमांक लागतो. गेल्या आठवड्यात, BSE 30- शेअर सेन्सेक्स 107.97 अंक किंवा 0.19 टक्के घसरला.

Leave a Comment