Marriage Loan Interest : भारतीय लग्न म्हणजे जणू एक मोठा सोहळाच. पाहुणेमंडळी, मेन्यू ,सजावट, उंची कपडे , सगळ्यासाठी मोठा तामझाम आणि खर्च केला जातो. त्यातही हल्लीच्या लग्नाचा ट्रेंड काही विचारूच नका. मोठी भव्यता आताच्या लग्नांमध्ये पाहायला मिळते. लग्न म्हंटल की खर्च आलाच. आता लग्न खर्च पेलण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळायला सुरुवात झाली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने पसर्नल लोन अनसिक्योर्ड म्हटले आहे. लग्नासाठी साधीसुधी रक्कम नाही तर अनेक बँकांनी लग्नासाठी एक कोटीपर्यंत कर्ज देणे सुरु केले आहे. लग्नासाठी कर्ज घेणारे ग्राहक वाढत आहेत.
लग्न कर्ज घेतानाच्या अटी
लग्नासाठी कर्ज घेताना वय २१ वर्षे पूर्ण असावेत.
हे कर्ज फिरताना वय ६० पेक्षा जास्त नसावे.
कर्ज घेणाऱ्याला किमान मासिक वेतन १५ हजार असावे.
क्रेडीट स्कोर ७५० पेक्षा जास्त असला पाहिजे
कागदपत्रे
आधार कार्ड
घराचा पुरावा म्हणून( वीज बिल, टेलिफोन बिल, आधार, मतदान कार्ड)
मागील तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट
नोकरीचा पुरावा आणि पगार पत्रक
काय आहे व्याजदर ?
एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व, टाटा कॅपिटल, एसबीआय आणि लँडिंगकार्ट या बँकांकडून कर्ज दिले जात आहे. त्यासाठी व्याजदार १०.४९ टक्क्यांपासून ३६ टक्क्यांपर्यंत आहे. हा व्याजदर सिबिल स्कोरवर अवलंबून आहे. सिबिल स्कोर चांगला असले तर व्याज कमी लागते. एक ते सात वर्ष कर्ज फेडण्याचा कालावधी दिला आहे. भारतात लग्नाचे मार्केट आठ लाख कोटी असल्याचे केपीएमजीने म्हटले आहे.