हैद्राबाद : वृत्तसंस्था – हैद्राबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घराशेजारी राहणाऱ्या दोन जणांनी एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. या नराधम आरोपींनी पीडित महिलेच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती तिच्या घरच्यांना देण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या आरोपींनी पीडित महिलेला एका अज्ञातस्थळी नेवून तिच्यावर अत्याचार केले. या अत्याचारानंतर पीडित महिलेनं आपल्या प्रियकरासोबत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित महिला शुद्धीवर आल्यानंतर हि घटना उघडकीस आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पीडितेनं हा धक्कादायक खुलासा केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना तेलंगणाची राजधानी हैदराबाद शहरातील एस आर नगर परिसरात घडली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पीडित महिला हि एक बांधकाम कामगार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचं तिच्या एका सहकाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. 13 डिसेंबर रोजी ती आपल्या प्रियकराला भेटायला चालली होती. यावेळी घराशेजारी राहणाऱ्या दोन जणांनी तिला आडवलं आणि प्रेमसंबंधाची माहिती तुझ्या घरच्यांना सांगू अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला एका अज्ञातस्थळी नेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
यानंतर या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडित महिलेनं आपल्या प्रियकरासोबत किटकनाशकाचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण बेशुद्ध होण्यापूर्वी प्रियकराने याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली होती. यानंतर प्रियकराच्या नातेवाईकांनी तातडीने दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. उपचार केल्यानंतर, 17 डिसेंबर रोजी पीडित महिलेला शुद्ध आली. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.