औरंगाबाद | फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणाने विवाहितेची ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार करून तिला सतत भेटायला बोलण्यासाठी बोलवत असे. तिने नकार दिल्यावर त्याने तिच्या नातेवाईकांना मेसेज पाठवून बदनामी सुरु केली. पीडितेने त्याच्या त्रासाला कंटाळून पोलिसात धाव घेतली. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक उर्फ विक्की पाटील (रा.मालेगाव जि. नाशिक) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपीने नऊ जुलै 2019 रोजी फेसबुक वर पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पीडितेचे माहेर असलेल्या मालेगावचा तो रहिवासी असल्याने तिने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. तेव्हापासून तो पीडितेच्या संपर्कात होता. फेसबुक मेसेंजर बॉक्स मधून मेसेज पाठवून पीडितेशी जवळीक निर्माण केली.
माहेरचा असल्यामुळे पिडिता त्यासोबत सुखदुःखाच्या भावना व्यक्त करीत असे. याचाच गैरफायदा घेत तो तिला भेटायला औरंगाबाद शहरातील तिच्या घरी गेला. पीडिता घरात एकटीच असल्याची संधी साधून त्याने तिच्यावर बळजबरी करीत अत्याचार केला. 2019 ते सहा मार्च 2021 या कालावधीत त्याने तिच्यावर अशाच प्रकारे चार वेळा अत्याचार केला. लॉक डाऊन कालावधीत तो तिला भेटण्यासाठी घराबाहेर बोलावू लागला. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे आता आपल्याला भेटता येणार नाही असे तिने त्याला अनेकदा बजावले मात्र तो एकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे तो तिला सतत कॉल करून आणि मेसेज पाठवून भेटण्यासाठी आग्रह करीत असे.
पीडितेने नकार दिल्यावर त्याने तिच्या पती आणि अन्य नातेवाइकांना मेसेज पाठवून पीडितेची बदनामी करण्यास सुरुवात केली. त्रास असह्य झाल्यावर पीडितेने 7 मार्च रोजी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार दिली अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा