जगातील सर्वात मोठ्या हॉटेल चेनने १०००० कर्मचार्‍यांना दिली बिनपगारी सुट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी हॉटेल साखळी मॅरियट इंटरनॅशनलने कर्मचार्‍यांना रजेवर पाठवले आहे. ही रजा बिनपगारी स्वरूपात दिली आहे. म्हणजेच या सुट्यांना कर्मचार्‍यांना पगार मिळणार नाही. करोनो व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं लोकांनी प्रवास थांबविला आहे. ज्यामुळे हॉटेल व्यवसाय ठप्प होऊ लागला आहे. मॅरियटने जवळपास सर्व स्तरावरील कर्मचारी सुट्टीच्या दिवशी पाठवले आहेत. यासह कंपनीने आपली काही हॉटेल्सही बंद करण्यास सुरवात केली आहे.

मॅरियटने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोनामुळे त्यांचा व्यवसाय कोसळत आहे. व्यवसायाच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. मॅरियटच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आमच्या भागीदारांना, आमच्या पाहुण्यांना आणि आमच्या मालकांना मदत करण्यावर भर देऊन आमच्या व्यवसायावरील परिणाम कमी करण्यासाठी तेजीने काम करीत आहोत.

करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गो-एअरने मंगळवारपासून आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा केली आहे. उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना हळू हळू बिनपगारी रजेवर पाठवणार आहे. कंपनी टप्पाटप्प्याने कर्मचार्‍यांच्या पगाराच्या 20 टक्के कपात करण्याचा विचार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कंपनीने वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे बऱ्याच देशांनी प्रवासी निर्बंध लादल्यानं विमान उद्योगाला सर्वाधिक फटका बसला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.