हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन मारुती (Maruti Suzuki Alto K10 CNG) सुझुकी Alto K10 नुकतीच भारतीय बाजारपेठेत रु. 3.99 लाख एक्स-शोरूम, किमतीत लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर कंपनी आता ही कार CNG पॉवरट्रेनसह लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तिच्या ऍव्हरेज मधेही मोठा फरक पडणार असून विक्रीतही अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
35 किलोमीटर मायलेज-
नवीन (Maruti Suzuki Alto K10 CNG) मारुती सुझुकी Alto K10 CNG ला तेच 1.0-L K10C इंजिन असेल. हे इंजिन CNG मोडमध्ये 56 PS आणि 82 Nm कमाल टॉर्क निर्माण करते. पेट्रोल मोडवर, हे इंजिन 67 PS आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मारुती सुझुकीची अल्टो K10 CNG व्हर्जन मध्ये सुमारे 35 किलोमीटर मायलेज देऊ शकते. असं झाल्यास ही कार देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी सीएनजी हॅचबॅक ठरेल.
किंमत- (Maruti Suzuki Alto K10 CNG)
गाडीच्या किमतीबाबत (Maruti Suzuki Alto K10 CNG) बोलायचं झाल्यास ही नवी अल्टो K10 CNG ची किंमत पेट्रोल कारपेक्षा सुमारे 1 लाख रुपये जास्त असण्याची शक्यता आहे . एकदा भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर, नवीन Alto K10 CNG टाटा टियागो सीएनजी, एस-प्रेसो सीएनजी वॅगन आर सीएनजी आणि सेलेरियो सीएनजी सारख्या प्रतिस्पर्ध्यांना तगडी फाईट देईल.
हे पण वाचा :
Mercedes Electric Car : मर्सिडीजने लॉन्च केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार
Maruti Suzuki Alto K10 : नवी Alto K10 बाजारात घालणार धुमाकूळ; पहा किंमत आणि फीचर्स
Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत
Mahindra Electric Cars : महिंद्राचा मोठा धमाका!! लवकरच लॉंच करणार 5 इलेक्ट्रिक SUV
Lamborghini Huracan Tecnica : लॅम्बोर्गिनीने लॉन्च केली जबरदस्त कार; ताशी 325 किमी स्पीड