Maruti Brezza ची ‘ही’ नवीन कार लवकरच होणार लॉंच; दमदार पॉवर आणि मायलेजही

Maruti Brezza
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगप्रसिद्ध असणाऱ्या प्रसिद्ध कार कंपनी Maruti Suzuki ने आता (Maruti Brezza) ची नवीन अशी SUV Vitara Brezza नवीन कार तयार केली आहे. त्यामध्ये पहिल्यापेक्षा अधिक दमदार पॉवर आणि मायलेज, फीचर्स असून हि जून 2022 म्हणजे या महिन्यात लॉन्च केली जाणार आहे.

(Maruti Suzuki) मारुती सुझुकी या कंपनीचे नाव आकर्षक आणि आलिशान कारच्या कंपनीत आजही मानाने घेतले जाते. अशातच आता मारुती सुझुकी या कंपनीने आपली दमदार अशी नवीन कार तयार केली आहे. मारुती सुझुकीची नवीन SUV Vitara Brezza हि कार भारताच नव्हे तर जगभरात खूप लोकप्रिय आहे. SUV Vitara Brezza हि Brezza Hyundai Venue, Kia Sonet, Tata Nexon, Mahindra XUV300 आणि Toyota Urban Cruiser यांना नक्कीच टक्कर देणार यात काही शंका नाही. (Maruti Brezza)

Maruti Brezza

 

पहिल्यापेक्षा अधिक दमदार असणार इंजिन (Maruti Brezza) 

मारुती सुझुकीच्या SUV Vitara Brezza च्या 2022 नव्या मॉडेलमध्ये 1.5 लीटर, 4 सिलेंडर K15C माईल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिनचा समावेश करण्यात आलेला आहे. जे डुअलजेट टेक्नोलॉजीसह सुसज्ज असेल. यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत, 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील दिला जाईल.

Maruti Brezza

असे असणार नवीन फीचर्स

मारुती सुझुकीच्या नवीन अशा SUV Vitara Brezza या नव्या मॉडेलमध्ये अधिक उत्तर दर्जाचे फीचर्स समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एक इंटीग्रेटेड 9.0 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसह नवीन असा डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे. शिवाय नवीन ब्रेझामध्ये वायरलेस चार्जिंग, अँड्रॉयड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्ट मिळेल. तसेच यात व्हेंटिलेटेड सीट्स, 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसह अनेक दमदार फीचर्स दिले जातील. नवीन मारुती ब्रेझाला तिचे सेफ्टी फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या जोरावर अधिक चांगले सुरक्षा रेटिंग मिळण्याची शक्यता आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल मिळू शकतं. तसेच इतरही स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स देण्यात आलेले आहेत. (Maruti Brezza)

Maruti Brezza

अशी असेल किंमत

मारुती सुझुकी विटारा ब्रेझा या कारच्या आउटगोइंग एडिशनच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले तर या कारच्या बेस व्हेरियंटची किंमत 7.84 लाख रुपये इतकी असेल तर याच्या टॉप-एंड व्हेरियंटसाठी ग्राहकांना 11.33 लाख (एक्स-शोरूम) रुपये मोजावे लागतील. नवीन ब्रेझाची किंमत याच्याच किंमतीच्या आसपास असू शकते किंवा 50 ते 70 हजार रुपयांनी वाढू शकते.

हे पण वाचा –

Maruti Suzuki लवकरच लाँच करणार ‘ही’ दमदार कार; Kia Carens ला देणार टक्कर?

Maruti Suzuki Alto : मारुतीची Alto नव्या अवतारात येणार; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Maruti Vitara Brezza : Tata-Hyundai ला टक्कर देण्यासाठी मारुती घेऊन येणार नवीन SUV

Maruti Suzuki Car Price | मारुतीने बदलल्या सर्व 9 गाड्यांच्या किंमती; चेक करा कोणती गाडी किती रुपयांना?

Maruti Suzuki दोनच दिवसांत घेऊन येतेय ‘अशी’ कार; किल्ली नसेल तर मोबाईलनेच होणार स्टार्ट