आता मास्कमध्येच हवेपासून बनेल ऑक्सिजन; युवा वैज्ञानिकाचा शोध

Mask
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची सर्वाधिक कमतरता आहे. एक- एक सिलिंडरसाठी लोक भटकत आहेत. ऑक्सिजनअभावी शेकडो लोकांनी प्राण गमावले. हे संकट दूर करण्यासाठी गोरखपूर येथील राहूल सिंह या तरूण शास्त्रज्ञाने एक नाविन्यपूर्ण काम केले आहे. ऑक्सिजनच्या गरजेनुसार त्याने असा मास्क तयार केला आहे ज्यामध्ये हवेपासून ऑक्सिजन तयार होईल असा ह्या तरुण वैज्ञानिकाचा दावा आहे.

राहुल सिंह म्हणतात की, ‘आम्ही स्वयंचलित इलेक्ट्रिक प्रगत तंत्रज्ञान नैसर्गिक ऑक्सिजन मास्क बनविला आहे. या मास्कचा आकार खूपच लहान आहे. आपण ते आपल्या खिशात ठेवू शकता. जर आपण ऑक्सिजन घेऊ शकत नसाल तर मग एक बटण दाबा ते हवेपासून ऑक्सिजन फिल्टर करेल आणि उपलब्ध करेल. जे आपण आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकतो. राहुल यांनी स्मार्ट मोटर सर्किट असलेल्या एअर मोटरची रचना केली आहे. सर्किटद्वारे, ही एअर मोटर ऑक्सिजन तयार करण्यासाठी हवेला सात वेळा फिल्टर करते. त्याचा फायदा गरजूंना मिळतो.

मदन मोहन मालवीय टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन सेंटरशी संबंधित राहुल सिंह यांचा असा दावा आहे की, त्यांनी बनवलेल्या उपकरणातून ऑक्सिजनची निर्मिती होते. राहुल म्हणतात की त्यांनी या डिव्हाइसमध्ये एक चिप बसविली आहे, जेणेकरून जर ते कुठेही खराब झाले तर लगेच त्याला कळेल. आणि घरी बसल्या बसल्या ते डिव्हाइस दुरुस्ती करता येईल. राहुलच्या म्हणण्यानुसार, त्याचे हे उपकरण कोणत्याही मास्कमध्ये वापरता येते. 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मास्कची किंमत 500 रुपये असेल आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयासाठी 800 रुपये असेल. सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केंद्रीय विक्री कर आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे अर्ज केला आहे.