Wednesday, October 5, 2022

Buy now

नमाजानंतर मशिदीत भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू; आजूबाजूच्या इमारतीही हादरल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील एका मशिदीत भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता एका तालिबानी प्रवक्त्याने दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी शेकडो लोक नमाज पठण करण्यासाठी खलीफा आगा गुल जान मस्जिद येथे जमले होते. त्यानंतर नमाज पठण झाल्यानंतर हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की मशिदीच्या आजूबाजूच्या इमारती हादरल्या. हा स्फोट नेमका कसा झाला याबाबत अधिक माहिती समजू शकली नाही.

गह मंत्रालयाचे उपप्रवक्ते बिस्मिल्लाह हबीब यांनी सांगितले की, “शुक्रवारच्या नमाजानंतर दोन तासांनी हा स्फोट झाला, त्यावेळी तेथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. स्फोटात किमान १५ जण जखमी झाले आहेत. अद्याप कोणीही या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ही मशीद अफगाणिस्तानातील बहुसंख्य सुन्नी मुस्लिमांची आहे.

दरम्यान, अफगाणिस्तान मध्ये गेल्या काही दिवसांपासून स्फोटांची मालिका सुरूच आहे. यापूर्वीही अल्पसंख्याक शिया मुस्लिमांना लक्ष्य करणाऱ्या मशिदींवर असेच हल्ले अफगाणिस्तानातं झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिना खानचे नवीन फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल. हिना खानची कातिलाना अदा पहाच …. . हिना खानचा हॉट अंदाज पहा ….. हिना खानचा गुलबी साडी मध्ये लेटेस्ट लूक. स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे; पहा…