Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला ब्रेक? कोर्टात याचिका दाखल, मंगळवारी सुनावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यातील शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोवर्ष गटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होणार आहेत. येत्या १४ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी हे पैसे महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागणार का? अशा चर्चा सुरु झाल्यात कारण माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.

मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार- Mazi Ladki Bahin Yojana

नावेद मुल्ला (Naved Mulla) नावाच्या याचिकाकर्त्याने माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल ( Petition Against Mazi Ladki Bahin Yojana) केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरु केली आहे. ही भ्रष्ट कृती असून हा मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. सामान्य जनता 28 टक्क्यांपर्यंत GST कर भरते. हे पैसे फुकट वाटण्यासाठी नाहीत असं नावेद मुल्ला यांनी आपल्या याचिकेत म्हंटल आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी मंगळवारी 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना कायद्याच्या कचाट्यात सापडणार का? हे पाहायला हवं. असं झाल्यास राज्यभरातील महिलावर्गाला हा सर्वात मोठा धक्का असेल.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून (Mazi Ladki Bahin Yojana) सरकारवर टीका केली होती. ही योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनी लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. महायुती सरकार राज्यावर कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल. लाडक्या बहीण योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जात आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांकडे ठेकेदार आणि जनतेकडून लुटलेले पैसे आहेत, असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर तोफ डागली.