सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. याठिकाणी शेतकरी विकास पॅनल 12 जागांवर विजयी झाले असून महाविकास आघाडी पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. याठिकाणी शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून साताऱ्यात प्रथमच वेगळं राजकीय समीकरण पहायला मिळाल होते. याठिकाणी भाजप राष्ट्रवादी युतीतुन एकत्र आले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी गट, ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट हे तिन्ही पक्ष आमदार गटाला टक्कर देत विरोधात निवडणूक लढत होते . भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे तिघे एकत्र निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे दीपक पवार, ठाकरे सेनेचे सदाशिव सपकाळ, शिवसेना शिंदे गटाचे संदीप पवार त्यांच्या विरोधात एकत्र येऊन निवडणूक लढवत होते . अखेर दीपक पवार आणि ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते सदाशिव सपकाळ यांच्या गटाला हार पत्करावी लागली आहे.
विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे
राजेंद्र सखाराम भिलारे 460
मच्छिंद्र लक्ष्मण मुळीक 533
प्रमोद बाजीराव शेलार 537
हनुमंत सहदेव शिंगटे 543
जयदीप शिवाजी शिंदे 531
प्रमोद शंकर शिंदे 535
हेमंत हिंदुराव शिंदे 530
पांडुरंग नमाजी कारंडे 865
गुलाब विठ्ठल गोळे 832
बुवा साहेब एकनाथराव पिसाळ 821