सभा होणारच ! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही : संजय राऊतांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात. संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले. मात्र, सभा होणारच ! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दिलाय.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत बेळगावला दाखल झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे जाहीर सभा घेणार होते. मात्र, प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीचा मंच तोडला, त्यांच्या सभेला परवानगीही नाकारली.

 

खासदार संजय राऊत यांच्या सभेची धास्ती बेळगावात प्रशासनानेही घेतली आहे. यावेळी खासदार राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे कोणत्याही परिस्थिती सभा घेणारच, असा इशारा दिलाय.