Megha Ghadge : कडक उन्हाळ्यात प्रेमाचा वसंत बहरणार; ‘या’ दिवशी सिनेगृहात ‘अप्सरा’ अवतरणार

Megha Ghadge
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Megha Ghadge) मराठी सिनेविश्वाला कायम आपल्या मनमोहक अदाकारीने प्रेमात पाडणारी नृत्य बिजली लावण्यवती मेघा घाडगे एक सशक्त अभिनेत्री आहे. अभिनयासह बेभान नृत्य शैलीसाठी तिने आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आज मेघा घाडगे नावाची खास ओळख आहे. न केवळ अभिनेत्री तर पारंपरिक कला लावणी जपून तिने रसिक प्रेक्षकांच्या मनावर स्वतःचा ठसा उमटवला आहे. अशातच आगामी ‘अप्सरा’ या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होऊ घातला आहे.

कडक उन्हाळ्यात ‘अप्सरा’ वसंत फुलवणार

‘अप्सरा’ या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे (Megha Ghadge) आणि अभिनेता विठ्ठल काळे एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचे मोशन पोस्टर अलीकडेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले होते. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून हा चित्रपट रोमँटिक असावा असा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. त्यामुळे कडक उन्हात वसंत फुलवण्यासाठी ‘अप्सरा’ सज्ज झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ने या चित्रपटाची निर्मिती केली असून ही त्यांची पहिलीच निर्मिती आहे.

View this post on Instagram

A post shared by Apsara Marathi Movie (@shraman.films)

चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी ‘अप्सरा’ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘विठ्ठला शप्पथ’ हा उत्कृष्ट चित्रपट दिला आहे. यानंतर आता ‘अप्सरा’ या चित्रपटातून आणखी एक नवी गोष्ट घेऊन ते आपल्या भेटीस येत आहेत. अद्याप या चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र (Megha Ghadge) मेघा घाडगे या चित्रपटात चार चांद लावण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता आहे.

मेघा घाडगे आणि विठ्ठल काळेंची फ्रेश जोडी (Megha Ghadge)

मेघा घाडगेने आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्यातील अभिनेत्रीचे दर्शन प्रेक्षकांना घडवले आहे. मात्र ‘अप्सरा’ हा चित्रपट अभिनेत्री म्हणून तिच्यासाठी वेगळा ठरणार आहे. कारण या चित्रपटात मेघा घाडगे साकारत असलेली भूमिका ही अनोखी असून ती नक्की कोणती आहे? यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागणार आहे. तसेच आपल्या बहुआयामी भूमिकेतुन रसिक प्रेक्षकांच्या मनावर नुसत्या आपल्या बोलक्या डोळ्यातून अभिनयाची मोहोर उमटवणारे अभिनेते विट्ठल काळे हे देखील चित्रपटाची जमेची बाजू असणार आहेत. ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या मनाला भूल घालेल अशी आशा आहे.

सुरेल संगीताची साथ

(Megha Ghadge) ‘अप्सरा’ या चित्रपटाची जमेची बाजू सांगायची झाली तर, आपल्या रसभरीत गीतातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गीतकार मंगेश कांगणे यांनी चित्रपटासाठी आपल्या शब्दांना स्वरबद्ध केले आहे. त्यामुळे मजबूत कथेला कसलेल्या अभिनयाची साथ आणि त्यावर उत्तम संगीताचा तडका लागणार आहे. अशा या अद्भुत अनुभवासाठी प्रेक्षक मायबाप उत्सुक असतील, तर यात शंका नाही.