…अशा व्यक्तिमत्वाचे पुरुष महिलांना वाटतात अधिक आकर्षक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र – महिला स्वतःचे सौन्दर्य खुलवण्यासाठी अनेक उपाय – उपचार करतात . आज पर्यंत महिलांच्या कोणत्या गोष्टी पुरुषांना आकर्षक वाटतात यावर अधिक चर्चा होते . पण आज आपण पाहणार आहोत , पुरुषांच्या अशा काही स्वभाव वैशिष्ठ्य आणि व्यक्तिमत्व गुण जे महिलांना आकर्षित करतात .

१. महिलांशी आदराने केलेली वागणूक
प्रौढ असो किंवा युवक, तो महिलांचा सन्मान कसा राखतो यावर मुली नेहमी लक्ष देतात . हॉटेल मध्ये खुर्ची ओढून बसण्यास मदत करणारा पुरुष नाही तर अगदी सामान्यपणे चारचौघात तो घरातील महिलांशी कसा वागतो या कडे महिला नक्कीच लक्ष देतात . महिलांना आदरभाव देणारे पुरुष नेहमी आकर्षित करतात

२. व्यक्तिमत्व
पुरुषाचे व्यक्तिमत्व कसे आहे याकडेही महिला प्रामुख्याने लक्ष देतात. यात पुरुषांची देहबोली , शरीर रचना , मजबूत बांधा , महिलांना आकर्षित करतात . सुटलेले पोट महिलांना आवडत नाही .

३. टापटीपपणा
पुरुष रंगाने अगदी काळा जरी असला तरी त्याचा टापटीपपणा महिलांना आकर्षित करतो . विस्कटलेले केस या पेक्षा व्यवस्थित केस , स्वच्छ आणि नीटनेटके कपडे असतील तर असे पुरुष आकर्षक दिसतात असे अनेक महिलांचे म्हणणे आहे . पुरुषांचे मोठे केस महिलांना आवडत नाहीत .

४. दाढी

1

महिलांना सर्वात आकर्षित करते ती दाढी . व्यवस्थित ट्रिम केलेली दाढी महिलांना आवडते . तर काही महिलांना क्लीन शेव्ह देखील आकर्षित करते .

५. महत्वाकांक्षी किंवा दूरदृष्टी असणारे पुरुष
चांगले आयुष्य जगण्यासाठी जागे पणी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची दूरदृष्टी आणि महत्वकांक्षा हे गुण महिलांना आकर्षित करतात .