जितेंद्र आव्हाडांचा मियाँ जित्तुदीन असा उल्लेख; भाजपच्या महाशयांनी सांगितलं कुंभमेळा घेण्यामागचं अजब कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रातिनिधीक स्वरूपात आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं. असं म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन हरिद्वार कुंभ मेळ्याच्याआयोजनाबद्दल शंका उपस्थित केली होती. या शंकेला भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटरद्वारे पत्र लिहून सविस्तर उत्तर देत जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे.

आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी जितेंद्र आव्हाड यांचा विशेष शैलीत उल्लेख केला आहे. भोसले यांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, “मियाँ जितुद्दीन, जे कळतं तेच बोला, मंत्री असणारा माणूस किती निर्बुद्ध आहे याचं उत्तम उदाहरण जित्तुद्दिन उर्फ जितेंद्र आव्हाड आहेत. कुंभाचा निर्णय तुमच्या डोक्याने नाही तर ग्रहस्थिती नुसार होतो. गुरु कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असा आवश्यक अमृत योग 2022 मधे नव्हता. हा निर्णय वेदशास्त्र तथा ज्योतिषशास्त्रात पारंगत असलेल्या ‘विद्वत परिषद’ तसेच शंकराचार्य, आचार्य आणि आखाडा परिषद यांच्या मान्यतेने झाला. यापूर्वी अशीच घटना सन 1760,1885 आणि 1938 मध्ये झाली आहे.

केंद्र सरकार आणि उत्तराखंड सरकारने धर्मादेशाचे पालन केले. महाराष्ट्रात वारी, देवस्थाने बंद ठेऊनही जगात कोरोनाचा सर्वाधिक प्रसार,उद्रेक आणि मृत्यु महाराष्ट्रात झालेत आणि होत आहेत. या महापापाला तुमचं सरकार जबाबदार आहे, तेव्हा आधी स्वत:च्या अपयशावर बोला ! एक मुंब्र्याचा मोहल्ला राखण्याच्या नादात आम्हाला धर्मशास्त्र शिकवू नका.”

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, कुंभमेळा सुरू होण्याच्या तोंडावरच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. या कुंभ मेळ्यावरून आव्हाड यांच्यावर भोसले यांनी ट्विटर द्वारे पत्र लिहून चांगलंच तोंडसुख घेतलं आहे.

You might also like