हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेसह एकूण 4 याचिकांवर आज सरन्यायाधीश एन. वी. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसंघवी यांनी शिवसेनेकडून युक्तिवाद सुरु केला तर शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला.
पक्षांतर बंदी कायद्यानुसार, या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल किंवा त्यांनी नवीन पक्ष बनवावा. सरकार हवं असेल तर नवा पक्ष किंवा विलीनीकरण हाच पर्याय असू शकतो असं सिब्बल यांनी म्हंटल. शिंदे गट स्वतःला मूळ पक्ष सांगू शकत नाही. तसेच १० व्या सूचनेनुसार मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय हे सुद्धा कपिल सिब्बल यांनी कोर्टात वाचून दाखवले. यावेळी त्यांनी कर्नाटकाचा दाखला देत पक्षाचा विप मान्य केला नाही तर आमदार अपात्र कसे होऊ शकतात याचेही वाचन त्यांनी कोर्टात केलं.
उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. शिंदे गटाच्या याचिकेतही तसा उल्लेख आहे. शिंदे गटाकडे बहुमत असलं तरी त्यांना मूळ पक्षाचा व्हिप मानावा लागेल असं सिब्बल म्हणाले. विधिमंडळात सदस्यत्वं म्हणजे पक्षाची मालकी नव्हे. हे जर असच चालू राहील तर देशात कोणतीही सरकारे पाडले जातील अशी भीतीही कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली.
शिंदे गटाचे हरीश साळवी काय म्हणले-
पक्षांतर बंदी कायदा लोकशाहीच्या आत्म्याला बदलू शकत नाही. आमदारांनी पक्ष बदलेला नाही त्यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा त्यांना लागू होत नाही. शिवसेनेत अनेक अंतर्गत अडचणी आहेत. मुख्यमंत्री जर भेटत नसेल तर नेता बदलायला काय हरकत आहे ?? पक्षात २ गट पडू शकत नाही का ? असा सवाल साळवे यांनी केला. साळवे यांनी यावेळी १९६९ चा काँग्रेस फुटीचा दाखला यावेळी दिला.