हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त अरब अमिरात(यूएई) देखील कोरोना विषाणूच्या लढाईत लढत असलेल्या भारताच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. कोरोनाच्या या कठीण काळात युएईने भारताच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी बुर्झ खलिफा ही सर्वात उंच इमारत ‘तिरंगा’ रंगाने प्रज्वलित केली. वास्तविक, भारतातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत सौदी अरेबिया, यूके, अमेरिका यासह अनेक देश भारताबरोबर उभे असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, युएईने भारतावरील आपले समर्थन व प्रेम व्यक्त करण्यासाठी बुर्झ खलिफाला तिरंगामध्ये रंगविले. या उंच इमारतीतून #StayStrongIndia चा संदेश देखील देण्यात आला आहे.
युएईमध्ये भारतीय दूतावासाने रविवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘भारत कोरोनाविरूद्ध भयंकर लढाई लढत आहे, अशा परिस्थितीत त्यांचा मित्र युएई लवकरच सर्व काही व्यवस्थित व्हावो अश्या शुभेच्छा पाठवितो’. व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की, बुर्ज खलिफा इमारत तिरंगी लाईट लावुन कशी चमकत आहे. तिरंग्याव्यतिरिक्त इमारतीवर #StayStrongIndia टॅग देखील दिसतो.
महत्त्वाचे म्हणजे, भारतातील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे वाईट होत चालली आहे. या लढाईत लस हे एक मोठे शस्त्र आहे, परंतु अमेरिकेतून लस तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी होती. पण आता त्याच निर्णयावर नरमाई करत अमेरिकेने भारताला मोठा दिलासा दिला आहे. रविवारी अमेरिकेने असे सांगितले की, ते लस तयार करण्यासाठी आवश्यक असणारा प्रत्येक कच्चा माल पुरवतील. सोबतच, फ्रंट लाइन कामांना संरक्षण देण्यासाठी अमेरिकेमार्फत जलद निदान चाचणी किट, व्हेंटिलेटर आणि पीपीई किट त्वरित उपलब्ध करुन देण्यात येतील
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.