Meta Global Outage | केवळ 2 तासांसाठी इन्स्टा-फेसबुक बंद, परंतु मार्क झुकरबर्गचं झालं अब्जावधींचं नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Meta Global Outage  | मंगळवारी म्हणजेच 5 मार्च 2024 रोजी रात्री काही तासासाठी मेटाचे सर्व सोशल मीडिया अकाउंट बंद पडले होते. जगभरातील युजर्सला फेसबुक, इन्स्टा त्याचप्रमाणे थ्रेडस लॉगिन करायला अडचणी येत होत्या. लॉगिन केल्यास त्यांच्या अकाउंट आपोआप लॉग आऊट होत होते. त्याचप्रमाणे काही काळासाठी व्हाट्सअप देखील बंद पडले होते. काही तासांनी ही सगळी सेवा सुरळीत चालू झाली. परंतु तोपर्यंत मेटाचे मात्र अब्जावधी (Meta Global Outage ) रुपयांचं नुकसान झालेलं आहे.

आलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे मेटाला आणि मार्क झुकेरबर्गला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. सोबतच कंपनीचे आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. मेटाच्या या तीन मोठ्या सोशल साइट्स बंद असल्याच्या बातम्या येऊ लागताच कंपनीच्या शेअरची प्राईस १.५ टक्क्यांनी खाली गेली.

अमेरिकेतील मार्केट मंगळवारी बंद होताना मेटाच्या (Meta Global Outage ) शेअरची किंमत 1.6 टक्क्यांनी खाली होती. त्यामुळे मार्क झुकेरबर्गचे सुमारे 100 मिलियन डॉलर्सचे नुकसान झालेले आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये हा आकडा तब्बल 8 अब्ज रुपयांपेक्षा अधिक आहे.

एक्सवर दिली माहिती | Meta Global Outage 

मंगळवारी रात्री अचानक फेसबुक युजर्सचे अकाउंट लॉग आऊट झाले होते. त्यामुळे इंस्टाग्राम रिफ्रेश करणे आणि इतर गोष्टींना देखील त्यांना अडचणी येत होत्या. व्हाट्सअपवर मेसेज देखील जाण्याच्या तक्रारी येत होत्या. यावेळी मेटाचे अधिकारी अँडी स्टोन यांनी ही कल्पना एक्सवर पोस्ट करून दिली आणि त्यानंतर सुमारे 2 तासांनी मेटाच्या सर्व सेवा सुरळीत करण्यात आल्या होत्या.

यापूर्वी 2021 मध्ये देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला असा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. त्यावेळी तब्बल 7 तासांसाठी सोशल मीडिया साईट्स बंद होत्या. त्यावेळी देखील खूप मोठे नुकसान झाले होते.