हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बघेल तेव्हा फेसबुक – इंस्टाग्राम वापरणाऱ्या यूजर्सना मोठा झटका बसला आहे. ट्विटरच्या पाऊलावर पॉल टाकत आता मेटानेही आपल्या यूजर्ससाठी ब्लु टिक सेवा सुरू केली आहे. त्यामुळे कोणताही इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरकर्ता त्याच्या प्रोफाईलवर ब्लू टिक लावू शकतो, मात्र त्यासाठी त्याला पैसे मोजावे लागणार आहेत.
वेबवर साइन अप करणार्या यूजर्सना फक्त Facebook वर ब्लू टिक्स मिळू शकेल तर मोबाईल अॅप वापरकर्त्यांना Facebook आणि Instagram या दोन्हींसाठी ब्लू टिक्स मिळेल. ब्लु टिक म्हणजे एकप्रकारचा वेरिफिकेशन बॅज आहे, ज्यामुळे हे समजत कि सदर अकाउंट ऑथेंटिक आहे आणि सार्वजनिक व्यक्ती, सेलिब्रिटी किंवा ब्रँडशी संबंधित आहे.
कंपनीने सध्या पेड सबस्र्कीप्शन सेवा अमेरिकेत सुरू केली आहे, लवकरच ही सेवा अन्य देशांमध्येही सुरू केली जाईल. यासाठी वेबवर साइन अप करणाऱ्या यूजर्सना दर महिन्याला $11.99 ( 989 रुपये ) आणि मोबाईल अॅपद्वारे साइन अप करणाऱ्या वापरकर्त्यांना $14.99 प्रति महिना (1237 रुपये ) मोजावे लागतील.
ब्लू टिकची सर्व्हिस सर्वात आधी ट्विटरने सुरु केली. यापूर्वी फक्त बड्या लोकांना, राजकारणी लोकांना किंवा सेलेब्रेटींना ब्लु टिक ची सेवा मिळायची परंतु आता सामान्य यूजर्स सुद्धा या सेवेचा लाभ घेऊ शकतो. मात्र यासाठी त्याला पैसे मोजावे लागतील.