हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जबरदस्त फीचर्स आणि आकर्षक डिझाईनमुळे Apple चे iPhone जगभरात लोकप्रिय ठरले आहे. महागड्या या फोनचे अनेक नवनवीन व्हर्जन देखील बाजारात दाखल झाले आहेत. यामुळेच, महाग असूनही याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, या लोकप्रियतेच्या नावाखाली अनेक वेळा बनावट आयफोनची विक्री देखील केली जाते. अशा परिस्थितीत, आज आपण बनावट आणि खऱ्या आयफोनमधील फरक ओळखण्याच्या पद्धती जाणून घेउयात…
खरं तर, iPhone किंमत खूपच महाग असते. ज्यामुळे ते प्रत्येकालाच खरेदी करता येत नाही. मात्र याचाच फायदा घेत फसवणूक करणाऱ्या लोकांकडून बऱ्याचदा स्वस्तात आयफोन देण्याचे आमिष दाखवून बनावट आयफोन दिले जातात.
IMEI नंबर कडे लक्ष द्या. हे लक्षात घ्या कि, IMEI नंबर म्हणजे इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी. हा एक युनिक कोड आहे, जो सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे व्हॅलिड उपकरण ओळखण्यासाठी वापरला जातो. अशा परिस्थितीत आयफोन खरेदी कराण्याआधी IMEI नंबर आवर्जून तपासा. हे लक्षात घ्या कि, कोणत्याही उत्पादनाच्या बॉक्सवर IMEI नंबर लिहिलेला असतो.
त्याचप्रमाणे आपल्याला Apple ची वेबसाइट https://checkcoverage.apple.com/in/en वरूनही ते तपासता येईल. यासाठी वेबसाईटवर जाऊन IMEI नंबरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ज्यानंतर फोन बॉक्सवर दाखविलेला नंबर टाइप करावा लागेल. जर इथे काही डिटेल्स आढळून आले नाही तर आपला फोन बनावट असल्याचे समजून जा.
आपला आयफोन बनावट आहे कि खरा हे IMEI/MEID, किंवा ICCID द्वारे देखील शोधता येईल. यासाठी, Settings > General > About वर जा आणि सीरियल नंबर शोधा. यानंतर IMEI/MEID आणि ICCID साठी थोडेसे स्क्रोल करा. यानंतर Apple रजिस्ट्रेशन किंवा सपोर्ट फॉर्ममध्ये हे डिटेल्स पेस्ट करा.
हे जाणून घ्या कि, iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro MAX, iPhone 13 Mini, iPhone 12 Series आणि iPhone SE 3 सारख्या काही मॉडेल्समध्ये सेटिंग्जमध्ये सीरियल नंबर आणि सिम ट्रेवर IMEI/MEID लिहिलेले असतात.
हे पण वाचा :
Bank Loan : नवीन वर्षात ‘या’ दोन बँकांनी ग्राहकांना दिला मोठा झटका, आता कर्ज घेणे महागले
‘या’ Post Office योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा 2500 रुपये
New Business Idea : टोमॅटो केचपच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Indian Overseas Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर
Train Cancelled : आज रेल्वेकडून 261 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा