महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जाहीर, सत्यजित तांबेचं निलंबन : नाना पटोले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्यात जाहीर झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने काॅंग्रेस नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. तेथे शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असून सत्यजित तांबवेर आजच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

महाविकास आघाडी यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीबाबत उमेदवार जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे खा. अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले, भाजपाने अद्याप जुनी पेन्शन योजना लागू केली नाही. परंतु काॅंग्रेसचे सरकार ज्या- ज्या राज्यात आहे, तेथे जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे. त्यामुळे भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.

नाशिक मतदार संघात भाजपाला उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे आता स्पष्टता येईल.  मागून वार करण्याची पध्दत भाजपाने आणली. दुसऱ्यांची घरे फोडण्याची काम भाजप करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर दुरूउपयोग भाजप करत आहे, हे स्पष्ट झाले आहे. अनिल देशमुखांवर 100 कोटींचा आरोप केला आहे, तो अधिकारी कुठे आहे. त्याच्यावर कारवाई केली. ईडी, सीबीआयला कोर्टाने फटकारले आहे. आता महाराष्ट्राची जनता भाजपाला धडा शिकवेल.

महाविकास आघाडीचे मतदार संघ व उमेदवार पुढील
अमरावतीत – धीरज लिंगाडे
नागपूर- सुधाकर आडबेले
आैरंगाबाद – विक्रम काळे
नाशिक- शुंभागी पाटील
कोकणात- बाळाराम पाटील