हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card : आधारमधील डेटाच्या सुरक्षेबाबतच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. 27 मे रोजी UIDAI कडून एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. यानंतर हा वाद सुरू झाला आहे. यामध्ये आधार युझर्सना आपल्या आधार कार्डची फोटोकॉपी कोणत्याही संस्थेला देऊ नये असे सांगण्यात आले. तसेच याद्वारे आपल्या आधारचा गैरवापर होऊ शकेल, असेही सांगण्यात आले होते.
मात्र, या वादामुळे आधारच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. UIDAI ने दावा केला आहे की, आधार युझर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आधार डेटाच्या सुरक्षिततेसाठी मजबूत व्यवस्था करण्यात आली आहे. चला तर मग आपला आधार सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणती पावले उचलली पाहिजेत ते जाणून घेउयात. Aadhar Card
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन
Aadhar Card चा गैरवापर टाळण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आधारशी लिंक करणे. असे केल्याने आधारच्या व्हेरिफिकेशनसाठी OTP देणे असेल, हा OTP आधारशी लिंक केलेल्या मोबाइल क्रमांकावरच येईल. OTP शिवाय आधारचे व्हेरिफिकेशन करता येणार नाही. त्यामुळे आपल्या आधारचा गैरवापर टाळण्यासाठी मोबाईल नंबर नेहमी आधारशी लिंक करा. जर मोबाईल नंबर बदलला असेल तर नवीन मोबाईल नंबर आधारशी अपडेट करा.
मास्क्ड आधार कॉपी
जर कुठेही Aadhar Card ची फोटोकॉपी द्यायची असेल तर मास्क्ड आधार कार्डची फोटोकॉपी द्या. मास्क्ड आधार मध्ये पूर्ण आधार क्रमांकाऐवजी फक्त शेवटचे चारच अंक दिले जातात. ज्यामुळे कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून मास्क्ड आधार डाउनलोड करता येईल.
बायोमेट्रिक्स लॉक वापरा
बायोमेट्रिक्स लॉक करणे म्हणजे तुमचा अंगठा, बोटे आणि बुबुळाचे ठसे यांचा वापर करून केलेले लॉक. आपल्याला हे बायोमेट्रिक्स लॉक वापरूनही आधार सुरक्षित करता येईल. आपल्याला UIDAI च्या वेबसाइटवरूनही बायोमेट्रिक्स लॉक करता येईल. बायोमेट्रिक्स लॉक केल्यानंतरही OTP बेस्ड ऑथेंटिकेशन सुरूच राहील. आपल्याला तात्पुरते किंवा कायमचे बायोमेट्रिक्स लॉक देखील करता येईल.
व्हर्च्युअल आयडेंटिटी वापरा
व्हर्च्युअल आयडेंटिटी (VID) मध्ये आधार नंबर लपविला जातो आणि तात्पुरता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी तयार केला जातो. यामध्ये युझर्सच्या आधार क्रमांकाचा उल्लेख नसला तरी त्याची ओळख प्रमाणित केली जाते. VID फक्त काही काळासाठीच व्हॉइस असते. नवीन व्हर्च्युअल आयडेंटिटी तयार केल्यावर, जुना आपोआप क्लीअर होतो. आधार पोर्टल किंवा एम-आधारच्या मदतीने व्हर्च्युअल आयडेंटिटी तयार केली जाऊ शकते. Aadhar Card
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/
हे पण वाचा :
आपल्या Aadhar Card मधील माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
Multibagger Stock : सोलर सर्व्हिस पुरवणाऱ्या ‘या’ कंपनीने एका वर्षात दिला 1500% नफा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण, आजचा भाव पहा
सर्वात स्वस्त iPhone 13 कुठे मिळत आहे ते जाणून घ्या
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 25GB डेटा