हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू होत असताना मुंबईत आजपासून मेट्रो सेवेला (mumbai metro) पुन्हा सुरुवात होणार आहे. जवळपास ६ महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणारी मेट्रो सेवा पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. खरंतर राज्य सरकारने 15 ऑक्टोबरपासूनच मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे आता अखेर 19 ऑक्टोबरपासून (mumbai metro timings) या सेवेचा प्रारंभ होत आहे.
मागील आठवड्यामध्येच महाराष्ट्र शासनानं मुंबईतील मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता. ज्यानंतर सर्व पाहणीनंतर सोमवारपासून ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पहिली मेट्रो रुळावर येणार असल्याची अधिकृत माहिती मुंबई मेट्रो प्रा. लि.कडून देण्यात आली.
प्रवाशांसाठी मेट्रो सेवेतर्फे आखण्यात आलेले नियम –
1) तब्येत ठीक नसल्यास प्रवास टाळा.
2) प्रत्येक प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनींग करुन घ्या.
3) मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगची सक्ती असणार, प्रवेशद्वारावरच प्रवाश्यांचं स्क्रीनिंग होणार
4)सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळेत मेट्रो धावणार
5) आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याच्या सूचना
6) पीटीआयच्या वृत्तानुसार, 1,350 प्रवाश्यांची क्षमता असणाऱ्या मेट्रोमध्ये केवळ 360 लोकांना प्रवासाची मुभा
7) डिजिटल तिकीट, स्मार्ट कार्ड किंवा क्यूआर कोड आधारित तिकीटाचा अधिकाधिक वापर कऱण्याचं आवाहन.
8) मेट्रो प्रवासादरम्यान देण्यात येणारं प्लास्टिकचं टोकन दिलं जाणार नाही
9) प्रवासामध्ये कमीत कमी साहित्य न्यावं
10) मेट्रोमध्ये खूना केलेली जागा रिक्त ठेवण्याचं आवाहन
11) लहान मुलं आणि वयोरुद्ध नागरिकांना मेट्रोचा प्रवास टाळण्याचं आवाहन
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’