Saturday, February 4, 2023

सतत ढेकर येत आहे?? ढेकर येण्याची आहेत ‘हि’ कारणे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जेव्हा आपण कोल्ड्रिंक पितो. किंवा इतर कोणतेही ड्रिंक पितो त्यावेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायॉक्साइड असतात. ते जेव्हा शरीरात जाते. त्यावेळी त्याचा गॅस बनतो. आणि त्याचे ढेकर येण्यास सुरुवात होते. जेव्हा तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पिता त्यावेळी त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्यातून ठेकर येण्यास सुरुवात होते. पण ज्यावेळी तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पित नाही. तरीही तुम्हाला सारखे सारखे ढेकर येण्यास सुरुवात होते. त्याचे कारण काय असेल तर ते जाणून घेऊया. आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात कोणतेही पदार्थ पचण्यासाठी हे ऍसिड बॅक्टरीया असतात. ते चयापचयाचे काम करतात. त्यावेळी पोटात गॅस तयार होतो. पोटात तयार झालेला गॅस हा ठेकराच्या स्वरुपात बाहेर पडतो. तर काही गॅस फोर्ट च्या रूपात बाहेर पडतो.

अनेक वेळा असे म्हंटले जाते कि ठेकर देणे हि चांगली गोष्ट आहे. कारण शरीरातील गॅस बाहेर पडायला मदत होते. जर पोटात गॅस तसाच राहिला तर ऍसिडिटी होण्याची जास्त संभावना जास्त असते. ठेकर कधी कधी येऊ शकतो. याची माहिती आज आपण घेणार आहोत.

- Advertisement -

कारणे —

तुम्ही हवा गिळली असेल तर —

अनेक वेळा पोटात आपण जेवताना , चुंगम खाताना हवा गिळतो. त्यावेळी ती हवा आपण गिळलली असते. ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर काढणे गरजेचे असते. ती हवा पोटातून बाहेर पडत नाही. ज्यावेळी आपण टेन्शन मध्ये हवा जास्त गिळतो त्या आजाराला एरोफेजिया म्हणतात.

गॅस निर्माण करणारे पदार्थ खाल्यानंतर —

तांदळासारखे पदार्थ खाल्याने पोटात गॅस निर्माण होतात. स्टार्च असलेले पदार्थ जास्त खाल्याने सुद्धा ठेकर येतात. तुमची पचनसंस्था जर मजबूत नसेल तर त्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात सलाड खावा त्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते.

डायबिटीस —
जर तुम्ही डायबेटीस चे रुग्ण आहात . त्यावेळी सुद्धा तुम्हाला ठेकर याचा त्रास होऊ शकतो. कधी कधी जास्त पदार्थ खाल्याने सुद्धा हा त्रास सुरु होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’