हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसारख्या चंदेरी दुनियेच्या शहरात आपलं स्वतःच असं घर असावे अशी इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. मात्र सध्याच्या महागाईच्या काळात घरांच्या किमती सुद्धा गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अशावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास (म्हाडा) कडून परवडणाऱ्या दरात घरे मिळवण्याकडे मुंबईकर वाट पाहत असतो. आत्ताही म्हाडाने राज्यभरात 12,724 घरांची लॉटरी काढली यामधील असून 2152 घरे मुंबईत बांधण्यात येणार आहेत.
म्हाडाच्या 2023-24 अर्थसंकल्पात मुंबईतील घरांसाठी 3664.18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे एकूण 2152 घरे बांधण्याचे म्हाडाचे उद्दिष्टे आहे. गतवर्षीच्या म्हाडाच्या बजेटमध्ये मुंबईत 4623 घरांचे उद्दिष्ट होत मात्र यंदा यामध्ये कपात करण्यात आल्यामुळे मुंबईकरांसाठी निराशाजनक अशी ही गोष्ट आहे. कारण जास्तीत जास्त गरजवंत हे कोकण आणि मुंबईच्या लॉटरीकडेच डोळे लावून बसलेले असतात. आणि मुंबईत घर मिळालं पाहिजे यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. तरीही म्हाडाच्या या लॉटरीमुळे 2152 मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यापूर्वी आज आपण जाणून घेऊयात की म्हाडाकडून मुंबईतील कोणत्या प्रकल्पासाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याबाबत…
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पसाठी 2285 कोटी
कन्नमवार नगर विक्रोळी प्रकल्प- 213.23 कोटी
कोपरी पोवई – 100 कोटी
बॉम्बे डाइंग मिल वडाळा- 30 कोटी
अंटोप हिल वडाळा – 24 कोटी
मागाठाणे बोरिवली – 50 कोटी
खडकपाडा दिंडोशी – 18 कोटी
पहाडी गोरेगाव – 100 कोटी
सिद्धार्थनगर गोरेगाव – 300 कोटी
धारावी पुनर्विकास प्रकल्प- 59 कोटी
मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प गोरेगाव – 10 कोटी
पोलीस गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प वसाहत- 100 कोटी
याशिवाय म्हाडाकडून कोकण मंडळांतर्गत 5614 घरे बांधली जातील. यासाठी 741.36 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुणे विभागात 862 घरांचा निर्णय होणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात 540.70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मंडळांतर्गत 1417 घरे उपलब्ध होणार आहेत त्यासाठी 417.85 कोटींची तरतूद करण्यात आलीये , छत्रपती संभाजीनगर येथे 1497 घरे बांधली जातील. यासाठी 212.08 कोटी, नाशिक 749 फ्लॅट बांधले जाणार असून त्यासाठी 77.32 कोटी आणि अमरावती विभागात 413 घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी 146.24 कोटींची तरतुद केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://www.mhada.gov.in/mr