रुपेरी दुनियेतून | अमेरिका येथे होणाऱ्या सिल्व्हर आय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (SILVEREYE INTERNATIONAL FILM FESTIVAL) मऱ्हाटमोळ्या सुरज मधाळेची ‘वावटळ’ ही शॉर्टफिल्म प्रदर्शित होत आहे. कोंडगावचा सुरज मधाळे हा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, (FTII) पुणेचा माजी विद्यार्थी असून या आधी त्याची ही शॉर्टफिल्म कल्पनिर्झर आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवासाठी निवडण्यात आली होती. या महोत्सवात ‘वावटळ’ला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिकही मिळालं. याशिवाय ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही वावटळ दाखवण्यात आली.
18,19 आणि 20 सप्टेंबर 2020 रोजी हा चित्रपट महोत्सव ऑनलाईन होणार आहे. न्यु जर्सीमधून याचं ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे. जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील एकूण १२ चित्रपटांची या महोत्सवाससाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये निवडलेल्या ६ भारतीय भाषांमधील सुरजची वावटळ ही एक आहे. प्रत्येक चित्रपट दाखवल्यानंतर उपस्थितांना दिग्दर्शकाशी संवाद साधता येणार आहे.
सुरज उद्धव मधाळे याने भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, पुणे (FTII) येथे दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. “वावटळ” फिल्म त्याच्या अभ्यासक्रमाचा भाग होती. असमानतेच्या आणि व्यापारीकरणाच्या जगात एका कामगाराच्या जगण्यातील कोलाहाल ‘वावटळ’मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचं सूरजने सांगितलं. 18 ते 20 सप्टेंबरच्या कालावधीत सर्व रसिक प्रेमींना वावटळ शॉर्टफिल्म ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध होईल.
मला या गोष्टीमधून जे सांगायचे होते ते जगभरातल्या लोकांपर्यंत पोहचतय याचा आनंद आहे. मार्गदर्शक आणि कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हा प्रवास सोपा झाल्याचं सुरज सांगतो.
टीम वावटळ विषयी थोडक्यात –
प्रमुख व्यक्तिरेखा – रोहीत कोकाटे, पुजा पराडे, सेवाताई चव्हाण, स्वप्निल राजशेखर
फिल्मचे लेखन/दिग्दर्शन – सुरज उध्दव मधाळे
मेरा – मिकमा टेरशिंग लेपचा
संकलन – अनिकेत करंदिकर
ध्वनी – आदित्य घनश्याम
कला दिग्दर्शन – पंकज कतवारे
संगीत दिग्दर्शन – शुभम घाटगे
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.