चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वीच MI ने शेअर केला ‘सूर्या’चा खास व्हिडिओ; CSK च्या बॉलर्सना धडकी भरणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI VS CSK) यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघात एकापेक्षा एक दिग्गज आणि तगडे खेळाडू असल्याने आजचा सामना रोमांचक आणि रंगतदार होणार यात शंकाच नाही. क्रिकेटप्रेमींची सुद्धा तीच अपेक्षा असेल. मात्र या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) एक विडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. CSK च्या बॉलर्सना धडकी भरेल असाच हा विडिओ आहे.

खरं तर दुखापतीमुळे मुंबईच्या सुरुवातीच्या काही सामन्यात सूर्यकुमार यादव संघाबाहेर होता. मात्र मागील २ सामन्यात त्याने कमबॅक केलं आणि मुंबईला सुद्धा त्याचा फायदा झाला. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला, मात्र आरसीबी विरुद्धच्या सामन्यात मात्र मुंबईचा हा सूर्य खऱ्या अर्थाने तळपला.. सूर्यकुमार यादवनं आरसीबी विरुद्ध 17 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. आणि वानखेडे वरील आपल्या चाहत्यांना खुश केलं होते. आज मुंबई इंडियन्सचा सामना बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आहे. त्या मॅचपूर्वी मुंबई इंडियन्सनं सूर्यकुमार यादवचा नेट प्रॅक्टिसदरम्यानचा फटकेबाजी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सूर्यकुमार यादव मोठ मोठे फटके मारताना दिसत आहे.

आजच्या सामन्यात सुद्धा सूर्यकुमार यादवने तडाखेबंद खेळी करत मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर पुन्हा एकदा विजय मिळवून द्यावा अशीच अपेक्षा मुंबईच्या चाहत्यांची असेल. सूर्यकुमार यादव शिवाय, रोहित शर्मा, ईशान किशन, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांच्या कामगिरीवर सुद्धा मुंबईचा विजय अवलंबून असेल. चेन्नई सारख्या खोलवर फलंदाजी असलेल्या संघाला हरवायचे असेल तर मुंबईच्या फलंदाजांना मोठा स्कोर उभारावा लागेल हे नक्की.. तुम्हाला काय वाटतं? आजचा सामना मुंबई इंडियन्स जिंकेल कि चेन्नई?