हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.देशात २४ मार्च पासून लॉकडाउन सुरु करण्यात आला असून आता ३ मे पर्यंत तो वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे.याचा चांगलाच फटका उद्योगधंद्यांना बसला आहे.या लॉकडाउन दरम्यान दिल्ली-एनसीआरमधील मायक्रोब्रुअरीजकडून हजारो लिटर बीअर नाल्यांमध्ये टाकून देण्यात येत आहे.आतापर्यंत एनसीआरमध्ये तब्बल १ लाख लिटर फ्रेश बीअर नाल्यांमध्ये सोडण्यात आलेली आहे.ती बीअर प्लांटमध्येच पडून होती.तसंच ती बाटल्यांमध्येही भरण्यात आलेली नव्हती. ही बीअर खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्याच्या उत्पादनापेक्षाही अधिक खर्च येत होता.त्यामुळे ही बिअर नाल्यात सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. लाखो लिटर बीअर टाकून द्यावी लागल्यामुळे बीअर उत्पादकांच्या तोंडाला मात्र चांगलाच फेस आल्याचं दिसत आहे.
स्ट्रायकर अँड सोय ७ च्या ललित अहलावत यांनी आपल्या गुरुग्राम येथील सायबर हब आउटलेमधून ५ हजार लिटर बीअर नाल्यात सोडून दिली. तर प्रॅकस्टरच्या प्रमोटरनंही ३ हजार लिटर बीअर फेकून दिली. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यादरम्यान एनसीआरमधील तब्बल ५० मायक्रोब्रुअरीजना १ लिटरपेक्षा अधिक बीअर फेकून द्यावी लागल्याची माहिती समोर आली आहे.
बाटलीतील बीअरच्या तुलनेत फ्रेश बिअर ही लवकर खराब होण्याची शक्यता असते.प्लांटमध्ये फ्रेश बिअर ठेवण्यासाठी ती एका विशिष्ट तापमानात ठेवावी लागते.तसंच त्याच्यावर रोजच्या रोज देखरेख ठेवणंही आवश्यक असते.नेहमीच्या दिवसांमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बीअरचा साठा राहत नाही, अशी माहिती ब्रुअरी कन्सल्टन्ट ईशान ग्रोव्हर यांनी दिली.
चार आठवड्यांपूर्वी जेव्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली त्यावेळी अनेक प्लांट हे पूर्ण क्षमतेने भरलेले होते.तेव्हापासूनच ते आपल्याकडे असलेल्या साठ्याची देखभाल करत आहेत. ही समस्या केवळ लॉकडाउन पुरती मर्यादित नाही. लॉकडाउननंतरही अनेक ग्राहक व्हायरसच्या भीतीनं आणि सोशल डिस्टन्सिंगच्या चिंतेनं पहिल्यासारखे दुकांनांवर गर्दी करतील यात शंका आहे, असं ब्रुअर्सचं म्हणणं आहे.
परदेशाप्रमाणे बीअर कंपन्या घरपोच सेवेच परवानगी मागत होत्या. परंतु त्यांना परवानगी नाकारण्यात आली. राज्य सरकार बीअरच्या ग्लास ऐवजी जग किंवा जारमध्ये पॅकिंग केल्यानंतरच घरपोच सेवेची परवानगी देतील अशी आशा होती. परदेशात सध्या अशाप्रकारेच घरपोच सेवा दिली जाते आहे,असं ग्रोव्हर यांनी बोलताना सांगितलं. प्रत्येक जण हॉटेलमधून होम डिलिव्हरीची गोष्ट करत आहे. परंतु ब्रुअरी मालकांना मोठं नुकसान सोसावं लागत आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.