हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान राजस्थानमधील हनुमानगडमध्ये कोसळले आहे. हे विमान एका घरावर पडले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. मात्र, दोन्ही पायलट सुरक्षित असून त्यांनी स्वत:ला बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. घटनेची माहिती मिळताच आसपासचे लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.
#WATCH | IAF and Rajasthan police officials at the spot in Hanumangarh where a MiG-21 fighter aircraft crashed, leaving 3 civilians dead
The pilot sustained minor injuries in the incident. pic.twitter.com/LJrxkJ9JaM
— ANI (@ANI) May 8, 2023
हवाई दलाने दिलेल्या निवेदनानुसार, हवाई दलाचे मिग-21 या विमानाने आज सकाळी नियमित प्रशिक्षण उड्डाण केले होते. त्याच दरम्यान अचानक हे विमान कोसळले. यावेळी दोन्ही पायलट स्वत:ला सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी झाले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. मिग-21 ज्या घरावर कोसळले तिथे 3 महिला आणि 1 पुरुष उपस्थित होता . यातील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर त्यानंतर आणखी एका जखमीने आपला प्राण सोडला.